मैंदर्गी नगरपरिषद भांडवली निधीतून कोविड सेंटर स्थापन करावे – नगरसेवक सिद्धराम.प.बिराजदार

अक्कलकोट (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – सध्या सोलापूर जिल्ह्यासह मैंदर्गी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून मागील १० ते १५ दिवसापासून शहरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना पुढील वैद्यकीय उपचाराकरीता सोलापूर येथील जिल्हा रुग्णालय अथवा इतर खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यासाठी मैंदर्गी ते सोलापूर जाण्यासाठी ५५ कि. मी चे अंतर असून किमान २ तासाचा कालावधी लागते.

या दरम्यान ताबडतोब योग्य उपचार न झाल्याने प्रवासादरम्यान उपचारापूर्वी मृत्यू होत आहे अशा परिस्थितीत मौजे मैंदर्गी ता. अक्कलकोट येथील नागरीकासाठी पन्नास खाटाचे ऑक्सिजन सुविधायुक्त डेडिकेटेड कोविड केअर सेंटर उभारल्यास निश्चितच गोरगरीबांचे प्राण वाचवायला मदत होईल.

परिस्थितीतचे गांभीर्याने लक्षात घेऊन आपण प्राधान्याने लक्ष घालून नगरपालिकेच्या भांडवली निधीतून पन्नास खाटाचे ऑक्सिजन सुविधायुक्त कोविड केअर सेंटर स्थापन करणेबाबत.१)मा.जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर,२)मा.जिल्हाप्रशासन अधिकारीसो,नगर, विकास विभाग सोलापूर ३)मा. तहसिलदार ,तहसिल कार्यालय,अक्कलकोट ४)मा. नगराध्यक्षा ,मैंदर्गी नगरपरिषद मैंदर्गी ,यांच्या कडे ईमेलद्वारे निवेदन पाठवून मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here