मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – मनपाच्या पूर्व प्रभाग व रवींद्र जोशी मेडिकल फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने व केशव सृष्टी च्या सहकार्याने वॉर्ड क्र 84 मधील नित्यानंद मनपा स्कुल सहार रोड , कोलडोंगरी, अंधेरी पूर्व येथे 30 बेडस करोना केअर सेन्टरचे उदघाटन माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस – विरोधी पक्ष नेता विधानसभा महाराष्ट्र राज्य ह्यांच्या शुभहस्ते तसेच माननीय श्री प्रविणजी दरेकर विरोधी पक्ष नेता विधान परिषद ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
विभागातील नागरिकांना जर करोना बाधा झाली तर योग्य उपचार मिळावेत म्हणून श्रीअभिजित सामंत स्थानिक नगरसेवक वॉर्ड 84 , श्री विकास बंका ह्यांनी हे करोना केअर सेन्टर कार्यान्वित होण्याकरिता विशेष प्रयत्न केले. ह्या प्रसंगी श्री संजय पांडे , नगरसेवक श्री सुनील यादव , श्री सुनील मोने , केशव सृष्टी चे श्री विमलजी केडीया , रास्व संघाचे विभाग संघचालक श्री संजीवजी झवेरी , श्री सदाशिवराव कुलकर्णी , RJMF चे संस्थापक श्री संतोष केळकर , CA श्री सुनील मोने आदी मान्यवर उपस्थित होते.

या सेन्टर मध्ये वातानुकूलित व्यवस्था, उपचार, चहा नाष्टा,जेवण (iskon juhu येथे तयार केलेलं) , मनोवैज्ञानिक तज्ञ द्वारा समुपदेशन, tv , wifi , recreation centre, काही बेडस ऑक्सिजन पूरक सोयी (म्हणजेच oxygen concentrator, cylinder) , समर्पित रुग्णवाहिका सेवा ह्या सुविधा विनामूल्य उपलब्ध असतील.या केंद्रात मनपा वॉर रूम मार्फत ऍडमिशन दिली जाईल.
ह्या केंद्रात 60 वर्षा खालील व्यक्ती , ज्यांना अस्थमा, हृदय विकार, किडनी इ आजार नाहीत तसेच ज्यांची लक्षण सौम्य असतील अशांना दाखल करून घेण्यात येईल.अशी माहिती नगरसेवक वॉर्ड 84 चे नगरसेवक अभिजित सामंत यांनी दिली.






