धरणगाव शिवसेनेने केले युरिया वाटपाचे नियोजन

धरणगाव (योगेश पी पाटील) – जळगांव जिल्हा मधे युरिया खतांची टंचाई निर्माण झाली होती, शिवसेना जिल्हा प्रमुख जळगांव गुलाबराव वाघ यांनी जिल्ह्यातील युरिया टंचाई व शासकीय मका खरेदी संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना उद्धव साहेब ठाकरे यांच्या शी व्हिडीओ कान्फ्रेंस द्वारे हि समस्या मांडल्या, त्यावेळी कृषि मंत्री दादा भुसे हे सुद्धा आॅन लाईन होते, त्याच वेळी दादा भुसे यांना आदेश दिला कि जळगांव जिल्हात खत टंचाई होता कामा नये, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व कृषी मंत्री दादा भुसे यांनी संबंधित खते निर्माण करणारे कारखाने यांच्या शी ताबडतोब बोलुन हा प्रश्न निकाली काढतो अशा आशयाचे वचन दिले,
त्या प्रमाने आज धरणगाव शहरात युरिया आला, हे शिवसैनिकांना समजताच त्या दुकानावर शिवसैनिक जावुन आलेल्या भावात युरिया विकायला लावला, ब-याच शेतक-यानी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना रांगा लावून युरिया चे वाटप शिवसैनिकांनी करायला लावले, त्या ठिकाणी दुकान मालक वाल्मिक पाटील यांनी हि सहकार्य केले, शिवसैनिक युरिया वाटपात मदत करीत आहे, हे पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या मिश्र खताचा संदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील, नगरअध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेद्र महाजन यांच्या कडे कराव्यात असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले आहे. यावेळी नगरसेवक विलास महाजन, वासुदेव चौधरी, जितेंद्र धनगर, सुरेश महाजन, किरण मराठे, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे,धिरेंद्र पुरभे शिवसैनिक, हेमंत चौधरी, संजय चौधरी, राहुल रोकडे, सतीश बोरसे, रवींद्र जाधव, परमेश्वर महाजन,समाधान महाजन पाळधी,दीपक पाटील इत्यादी जन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here