ठाणे (मुनिर खान) – अंबरनाथ येथील आंबेडकर नगर बी केबिन येथे सर्व मागासवर्गीय रोजमदारीलवर काम करणारे तसेच रिक्षा चालक
राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून नवीन चेंबरचे बांधकाम करण्यात आले. प्रशासनाने हे काम ज्याला दिले आहे, तो कोण आहे, त्याचे बजेट किती आहे किंवा त्यासाठी कोणाकडे तक्रार करावी किंवा त्याची वेबसाईट काय यासंबंधीचा कोणताही कागदपुरावा त्या ठिकाणी लावला गेला नाही. या बांधकामामुळे बी केबिन रोड शिक्षक दि कॉम्प्लेक्स पासून सुरू झालेला सिमेंटचा रस्ता महात्मा फुले चौकापर्यंत गेलेला आहे. तरी मधेच तो अपुरा राहिलेला आहे. हे जे काम करायला घेतले त्यामध्ये नवीन चेंबरचे रिटन पाणी जुन्या चेंबरमध्ये येते. त्याचबरोबर या परिसरातल्या रस्त्याच्या बाजूला जे नाले होते. ते संपूर्णपणे बुजविण्यात आले. त्यामुळे सर्व नाल्याचे पाणी वाहत चाललेले आहे. त्यामध्ये ड्रेनेज लाईनचे पाणी बाहेर सोडण्यात आले. या सर्व कारणामुळे या विभागात दुर्गंधी पसरली आहे. माती वाहून गेल्यामुळे रस्त्यावरून चालणे देखील येथील रहिवाशांना कठीण झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांना चालायला त्रास होत आहे, गरोदर महिला पडण्याची भीती वाटत आहे. ३ ते ४ महिने झाले मुले नीट खेळू शकत नाहीत. अशा प्रकारे येथील रस्त्याची अवस्था झाली आहे. तसेच आंबेडकर नगरमध्ये जयभीम नावाचा चौथरा आहे त्यात पण सांडपाणी जात आहे. प्रशासकीय अधिकारी लक्ष देत नाहीत. स्थानिक नगरसेवकाला तक्रार केली असता ते म्हणतात की, माझी कारकीर्द संपली आहे. मी काही करू शकत नाही. आंबेडकर नगरमध्ये गेली ४ वर्षे राहणारे भाडेकरू अंबादास घानेटकर यांनी माजी नगरसेवक (२००४ साली निवडून आले होते.) सुनील तुकाराम वाघमारे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी प्रत्यक् येऊन तिथली पाहणी केली. त्यांच्या सहकार्याने नगरपालिकेची गाडी आणून चेंबर साफ केले तरी काही फरक पडला नाही. मग सुनील वाघमारे यांनी दिनांक १९ जुलै २०२० रोजी, सकाळी ११ वाजता भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित करंजुले, दिलीप कणसे ,विश्वास निंबाळकर तसेच काही कार्यकर्त्यांसह या ठिकाणची पाहणी केली. त्यांनी पाहिले की काय भ्रष्टाचार झाला आहे, आणि हे उघडकीस आणायचे आहे व यासंबंधी जर काही कारवाई झाली नाही तर येत्या दोन दिवसात येथील रहिवासी उपोषणाला बसणार असल्याचे पत्र प्रशासनास देण्यात येणार आहे.
या जागेचे नाव आंबेडकर नगर ऐवजी कुलकर्णी पंत नगर किंवा जोशी नगर असते तर या पद्धतीने दुर्लक्ष केले गेले असते का? असा प्रश्न येथील रहिवासी, भाडेकरू अंबादास घानेटकर यांनी केला आहे . तसेच येथील नागरिक सध्या पोलिसांवरील जो ताण आहे. याचा विचार करून अजूनपर्यंत पोलीस स्टेशनला तक्रार करत नाहीत. पण वेळ आली तर ते देखील करावे लागेल असे स्पष्ट येथील रहिवाशांनी सांगितले आहे.







