18+ कोरोना लसीकरण रजिस्ट्रेशनला आज सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात

    देशात आधीच कोरोना लसीचा तुटवडा असताना केंद्र सरकारने १८ वर्षांवरील लोकांसाठी १ मे पासून लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आज, २८ एप्रिलपासून लसीसाठी नोंदणी सुरु होणार असल्याचे सांगितल्याने मध्यरात्रीपासूनच अनेकांनी रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांचे जन्म वर्ष टाकताच ४५ वर्षांनंतरचेच रजिस्टर करू शकतात असा मेसेज येत आहे. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

    १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. यासाठी कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. हे रजिस्ट्रेशन बुधवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरु होणार आहे. ४५ वर्षांवरील लोकांसाठी रजिस्ट्रेशन आधीसारखेच उपलब्ध असणार आहे.

    कोरोना लस हवी असेल तर त्यासाठी तुमचे वय त्यामध्ये बसणे गरजेचे आहे. तसेच यासाठी http://www.cowin.gov.in किंवा को-विन अॅप द्वारे रजिस्टर करता येणार आहे. यामध्ये तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागणार आहे. रजिस्टर करताना तुमच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्राव्हिंग लायसन किंवा मतदार ओळखपत्र असणे गरजेचे आहे. त्यावरील आयडी नंबर आणि इतर माहिती तंतोतंत जुळणारी टाकावी लागणार आहे.

    जाणून घ्या कशी असेल रजिस्ट्रेशन प्रोसेस….
    www.cowin.gov.in या अधिकृत साईटवर जा.
    Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
    तुम्हाला OTP येईल तो तेथे टाका व क्लिक करा.
    Vaccine Registraction form भरा.
    schedule appointment वर क्लिक करा.
    पिन कोड टाका (उदा.422601)
    Sesstion निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.
    Vaccin center व Date निवडा.
    Appointment book करून ती conform करा.
    Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
    हा मेसेज जपून ठेवा, लसीकरण केंद्रावर तुमचे ओळखपत्र आणि हा मेसेज दाखविल्यास लस देणे सोपे होईल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here