मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेत्री नेहा धूपिया ही स्पष्ट बोलणारी आणि समर्पक उत्तर देण्यासाठी ओळखली जाते. आता नेहा पुन्हा चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर ब्रेस्टफीडिंगचा फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो का शेअर केले, यामागे कारण आहे. इतकेचं नाही तर एका महिलेकडे एक व्यक्ती ब्रेस्टफीडिंग करण्याचा व्हिडिओ मागणाऱ्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे.
सविस्तर वृत्त असे की, सोशल मीडियावर एका महिलेकडे एक व्यक्ती ब्रेस्टफीडिंग करण्याचा व्हिडिओ मागत होता. हा प्रकरा नेहाला रुचला नाही. तिने चक्क आपली मुलगी मेहरला ब्रेस्टफिडिंग करतानाचा फोटो शेअर केला आहे. आणि त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे.
नेहाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय, मी अशा पद्धतीच्या चुकीच्या कमेंटकडे दुर्लक्ष करते किंवा ते डिलीट केले असते. पण, ही गोष्ट मला रुचली नाही. ही गोष्ट सर्वांसमोर आणावी, मला असं वाटतं. अशा मानसिकतेचे लोक ब्रेस्टफीडिंग खूप चुकीच्या पद्धतीने घेतात.
नेहाने इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट लिहिली आहे, ‘ती पोस्टमध्ये म्हणते, नव्या आईचा प्रवास काय असतो ती फक्त एक आईच समजू शकते. एकाबाजूला आई होण्याचा आनंद तर दुसऱ्या बाजूला नव्या जबाबदाऱ्या असतात. आई होणं खूप कठीण असतं. या परिस्थितीत त्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. मीदेखील या परिस्थितीतून गेले आहे. आजही ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या आईला चुकीच्या नजरेने काही लोक पाहतात. मी जेव्हापासून आई झालेय तेव्हापासून मी सार्वजनिक ठिकाणी दूध पाजण्याला प्राधान्य दिलं आहे. या गोष्टीबाबत सर्वांनी संवेदनशील होण्याची गरज आहे.’






