मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबायचे नाव घेईना. केवळ सामान्य लोकचं नव्हे तर कलाकारही कोरोनच्या विळख्यात सापडले आहेत. आता अभिनेत्री हिना खानलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. हिनाच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. निधनानंतर हिनाने आपल्या सोशल मीडियावरून आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली होती.
हिना कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितलं की, प्रत्येक प्रकारे काळजी घेत आहे. कोरोनाचे नियम पाळत आहे. तिने सर्वांना कठीण प्रसंगात सुरक्षित राहण्यासाठी सांगितलं आहे. हिनाने पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी या कठीण समयी, मी कोविड-१९ पॉझिटिव्ह आले आहे. डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार, मी स्वत: होम क्वारंटाईन झाली आहे आणि सर्व प्रकारची काळजी घेत आहे. मला आपल्या प्रार्थनेची गरज आहे. सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या.’
हिना खानच्या वडिलांचे कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले, तेव्हा ती श्रीनगरमध्ये होती. वडिलांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर ती मुंबईसाठी रवाना झाली. तिने सर्व लोकांचे आभार मानले आहेत, ज्यांनी कठीण समयी तिची आणि तिच्य़ा कुटुंबाला साथ दिली होती. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स कोरोना संक्रमित झाले होते. यामध्ये अक्षय कुमार, आलिया भट्ट, रणबीर कपूर यांच्या नावाचादेखील समावेश आहे.






