परभणी (प्रतिनिधी) – येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लँटवर मंगळवारी (दि. २७) रात्री अकराच्या सुमारास झाड कोसळल्याने ऑक्सिजनची गळती सुरू झाली, परंतु प्रशासनाच्या लक्षात ही बाब वेळीच आल्याने मोठी दुर्घटना टळली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी तातडीने याबाबतची माहिती जिल्हाधिकार्यांना दिली. त्यानंतर या ऑक्सिजन लाइनवर उपचार घेत असलेल्या चौदा बाधितांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले.
खासदार बंडू जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. या गळतीमुळे ऑक्सिजनच्या वाहिन्या फुटल्याचे कळते.






