पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना लोहगावमध्ये घडली आहे. संबंधित महिलेची ओळख पटली नसल्याने खूनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहगावमधील कोरभान प्लॉटिंग परिसरात एका महिलेच्या डोक्यात दगड घातलेल्या अवस्थेत मृतदेह पडला असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मंगळवारी सकाळी मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर खुनाचा प्रकार उघडकीस आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
खून झालेल्या महिलेने अंगात मोरपंखी रंगाचा गाऊन घातला होता. गळ्यात ओढणी व पायात चप्पल आहे. तिची ओळख पाठविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली.






