भारतीय महिला हॉकी संघाला कोरोनाचे ग्रहण, कर्णधार राणी रामपालसह 7 खेळाडू बाधित

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर सराव शिबिराला सुरुवात होण्यापूर्वीच भारताच्या महिला हॉकी संघाला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. कर्णधार राणी रामपाल हिच्यासह 7 हॉकीपटू तसेच दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये (साई) सराव शिबिराला सुरुवात होण्याआधीच या सर्वांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत.

भारताच्या महिला हॉकी संघाचा बंगळुरूमध्ये 25 एप्रिलपासून सराव सुरू होणार होता. 10 दिवसांच्या सुट्टीनंतर पुन्हा सर्व 25 खेळाडू ‘साई’च्या सराव शिबिरात दाखल झाल्या होत्या. 24 एप्रिलला सर्व हॉकीपटूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात 7 खेळाडू आणि 2 सहाय्यक कर्मचाऱ्यांना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे ‘साई’ने आपल्या पत्रकात म्हटले आहे. सर्व खेळाडूंना ‘साई’ केंद्रातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here