हनीमुनला अश्लील व्हिडीओ करुन पतीच करत होता ब्लॅकमेल; नवविवाहितेची आत्महत्या

फरीदाबाद (हरियाणा) येथे पतीपत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एनआरआय पतीने पत्नीला हनीमूनला नेले. तिथे तिचा अश्लील व्हिडिओ काढला. त्यावरून पती तिला ब्लॅकमेल करत होता. तसेच हुंड्याची मागणी करू लागला. या सगळ्याला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नवविवाहितेचे वडील हे फरीदाबादच्या सेक्टर २२ मध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, १५ मार्च २०२१ रोजी त्यांच्या मुलीचे लग्न फरीदाबादमधील सेक्टर १५ येथील रहिवासी अचल याच्यासोबत झाले होते. तो अमेरिकेत राहायचा. लग्नानंतर अमेरिकेत राहणार असल्याचे स्वप्न त्याने मुलीला दाखवले होते. मोठी-मोठी स्वप्ने दाखवणाऱ्या मुलीच्या पतीने दीड महिन्यांतच आपला स्वभाव दाखवायला सुरुवात केली. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर माझ्या मुलीने आत्महत्या केली, असे त्यांनी सांगितले.

लग्नानंतर पती-पत्नी हनीमूनसाठी गेले होते. पतीच्या डोक्यात काही वेगळेच सुरू होते, याचा तिला अंदाजही नव्हता. पतीने तिचे अश्लील व्हिडिओ काढले. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करू लागला. अमेरिकेत कार आणि घर खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकू लागला. त्यानंतर तिने ही घटना तिच्या वडिलांना सांगितली होती. पतीच्या याच त्रासाला कंटाळून मुलीने सोमवारी संध्याकाळी गळफास घेऊन आयुष्य संपवले. आमच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तिच्या वडिलांची आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी पती, सासू-सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला अटक केली असून, पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here