चैन्नई – दाक्षिणात्य सिने जगतातील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वतः अर्जुनने इंस्टाग्रामकरून त्याला कोरोना झाल्याची पोस्ट केली आहे.
मी कोरोनाचे सर्व प्रतिबंध काटेकोरपणे पाळत असून माझी प्रकृती ठीक आहे .माझ्या चाहत्यांनी माझी चिंता करू नये.त्यांनी स्वतःला जपावे आणि संधी मिळाली की लगेचच कोरोना लस घ्यावी असे आवाहन अर्जुनने इंस्टाग्राम संदेशात केले आहे.






