लॉकडाऊनचे नियम मोडल्याने अभिनेता जिमी शेरगिलला अटक

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिलला अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी पंजाब पोलिसांनी लुधियाना येथून त्याला ताब्यात घेतलं.

लॉकडाउनचे नियम झुगारुन तो चित्रपटाचं शूटिंग करत होता. शिवाय ज्या ठिकाणी त्याचं शूटिंग सुरु होतं, तिथं कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टंसिंग फॉलो केलं जात नव्हतं. अनेकांनी मास्क देखील लावले नव्हते. परिणामी लॉकडाउनचे नियम मोडल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

लुधियानामधील एका शाळेत चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. तेथील काही लोकांनी पोलिसांना या शूटिंग बाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलीस या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी शाळेत पोहोचले. अन् तिथं खरोखरच एका पंजाबी चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. निर्मात्यांनी तिथं कोर्टाचा सेट लावला होता. विशेष म्हणजे तिथं उपस्थित असलेल्या क्रूमेंबर्सनं मास्क लावले नव्हते. सोशल डीस्टंसिंगचे नियम देखील मोडले होते. परिणामी पोलिसांनी अभिनेता जिमी शेरगिल सकट तेथील सर्वांना अटक केली. निर्मात्यांच्या मते विशेष परवानगी घेऊनच त्यांनी चित्रीकरणाला सुरुवात केली होती. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here