क्रांती युवक मंडळच्या वतीने शिर्डी येथे हनुमान जयंती उत्सव साधेपणाने साजरा

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – हनुमान जयंती शिर्डीला हनुमान मंदिराचे विशेष महत्त्व आहे. साईबाबा स्वत: या मंदिरात येत असत. साई बाबा असतांना त्याचे नूतनीकरणही केले गेले होते.आज कोरोना साथीच्या आजारामुळे या वर्षी देखील मंदिर प्रशासनाने साथीच्या आजारांचे नियमांचे पालन करून विधिवत पूजा केली.

शिर्डीतील युवक या दिवशी हनुमान मंदिरासमोर ठेवलेला 125 किलो वजनाचा बजरंग गोटा (दगड) शिर्डी देवस्थान समितीचे माजी संचालक सचिन तांबे यांनी उचलून विधिवत शक्तीची पूजा केली.

प्रतिनिधीक स्वरूपात काही युवकांनी यात खंड पडू नये म्हणून १२० किलो बजरंग गोटा उचलून शक्तीरूपक हनुमानजीची पूजा केली. आजच्या काही दिवस अगोदर आम्ही तरुणांनी मिळून चांदीची गदा बनविली, त्या गदेचे पूजन करून सर्व तरुण निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करता ही चांदीची गदा 11 किलोची बनवून मंदिरात अर्पण करण्याचा संकल्पही आहे असेही सचिन तांबे म्हणले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here