मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – कोविड – १९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. बोरीवली येथील रहिवाशी आराधनाताई कोकाटे या ही याला अपवाद नाहीत. त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला.
बुधवार, दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजी राम नवमीचे औचित्य साधून ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल, बंबखाना व पार्क साईट येथील ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्य किट देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली. किटचे वाटप (वाटप करताना फोटो सुध्दा न घेता) कोकाटे यांनी केले. नव्या जुन्या पिढीतला बेबनाव अनेक घरातून दिसून येतो. आणि बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांच्या वाट्याला दुःख निराशा येते. आयुष्याच्या संध्याकाळी ते व्यथित होतात. ते सुखी कसे होतील हे पहाणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे मत आराधना कोकाटे यांनी बोलताना व्यक्त केले.
राम नवमी निमित्ताने ईशान्य मुंबईतील घाटकोपर, विक्रोळी येथे गरजवंत ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप केल्याबद्दल अनेकांनी आराधना कोकाटे यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा व आशिर्वाद दिले. तर अमृत नगर, बंबखाना व पार्क साईट येथील ज्येष्ठ नागरिकांकडून कोकाटे यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आशिर्वाद ही दिले.






