बकरी ईदची नमाज घरीच अदा करा- पोलीस अधीक्षक

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या आवारात जळगाव शहरातील पाचही पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे मस्जिद व इदगाह च्या विश्वस्तांची सभा पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षका श्रीमती भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन व पाचही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ,जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक चंदेल व पोलिस उपअधीक्षक (गृह )पाटील उपस्थित होते.
माननीय पोलीस अधीक्षक यांनी सुरुवातीलाच शासनाचे १७ जुलै २० चे ईद निमित्त चे परिपत्रक वाचून दाखविले व त्या प्रमाणे आपण ईद ची नमाज घरीच अदा करा,प्रातिकात्मक स्वरूपात कुर्बानी करा, असे आव्हान करून आपल्या काही सूचना असल्यास त्या सादर करा म्हणजे त्यावर सुद्धा कारवाई करता येईल.
सर्वप्रथम मुफ्ती अतिकउर रहमान यांनी आपल्या सुचना मांडतांना बकरी ईद रोजी मशिद व इदगाह मध्ये नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात यावी तसेच ईद चे महत्व व कुर्बानी ची भूमिका स्पष्ट केली. अयाझअली व हाफिज शाहिद यांनी सुद्धा आपली भूमिका विशद केली.
इतरांनी कायदा हातात घेऊ नये- फारूक शेख यांची भूमिका
तफारुक शेख यांनी परिपत्रकांमध्ये जनावरांची ची खरेदी विक्री ऑनलाइन पद्धतीने अथवा दूरध्वनीद्वारे करण्यात यावी याबाबत आपले म्हणणे मांडताना पारोळा -आर्वी रस्त्यावरील वसंत वाडी जवळ दिनांक २०-२१जुलै रोजी काही ग्रामस्थांनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चोपडा येथून मालेगाव कडे जाणाऱ्या टेम्पोला थांबून त्यामधील असलेल्या जनावरांना खाली करून संबंधित चालक व क्लीनर यांना अत्यंत अमानुषपणे मारहाण केली.
या मारहाणीत वसीम खान इंद्रिस खान व शेख मोबीन शेख कलीम राहणार मालेगाव हे दोघे गंभीर जखमी झाले त्यांना पोलिसांनी पारोळा येथील शासकीय दवाखान्यात भरती केले. परंतु त्या ग्रामस्थां विरुद्ध पोलिसानी कोणताही गुन्हा नोंदविला नाही उलट टेम्पो चालकांवर अनिमल कुएरिटी व अनिमल प्रेसर्वशन ऍक्ट खाली गुन्हा नोंदविला.
दिनांक २३जुलै रोजी त्यांना कोर्टा समक्ष हजर करून त्यांची जामीन झाली व ते मालेगाव येथे निघून गेले. पारोळा येथून मालेगावचे वाहन मालक यांनी फारुक शेख यांना सविस्तर घटना सांगून त्याबाबत काही व्हिडिओ क्लिप व फोटो सुद्धा व्हाट्सअप्प वर पाठविले जे संपूर्ण मालेगाव मध्ये व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओ क्लिप मध्ये वाहनाच्या क्लीनरला झाडाला दोरखंडाने बांधून त्याला मारण्यात येत आहे, त्याच्या तोंडातून रक्त निघत होते तरी त्यांना दया येत नव्हती तर चालक मार खाऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता.
सदर बाब फारुक शेख यांनी सभेत दि २३ जुलै दैनिक सकाळ मधील वृत्त व व्हिडीओ क्लिप माननीय पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके यांना दाखवले असता त्यांनी सदर प्रकरणी चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
फारुक शेख यांची विनंती आजपासून पुढील दहा ते बारा दिवस कुर्बानीसाठी वाहनांमधून जनावरे जातील त्या वाहनांमध्ये जनावरे तपासणीचा हक्क फक्त पोलीस व आरटीओ यांना आहे कोणत्याही इतर संघटनेच्या लोकांनी वाहन थांबून जनावरे खाली उतरून ड्रायव्हर व क्लीनर ला मारहाण करता कामा नये तसेच त्यांच्या खिशातील रक्कम सुध्दा काढता कामा नये अथवा त्यांच्याशी तोंडी पानी करता कामा नये अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न भयानक स्वरूपात निर्माण होईल यासाठी पोलिसांनी आवश्यक ती उपाय योजना करावी अशी मागणी केली असता माननीय पोलीस अधीक्षकांनी त्वरित ती मान्य केली.
एवढेच नव्हे तर उपस्थित जनसमुदायाला डॉक्टर उगले यांनी आव्हान केले की आपणास कोणतेही स्वरूपाचे दखल पात्र गैरकृत्य कोणीही करताना आढळून आल्यास त्यांनी त्वरीत आमच्याशी मोबाईल वर संपर्क साधावा त्यासाठी इतर कोणाची वाट पाहता कामा नये आम्ही आपल्या तक्रारीची त्वरित दखल घेऊ त्यामुळे उपस्थित जनसमुदायाने पोलीस दलाचे आभार मानले. येणारी बकरी ईद, गणेश उत्सव व इतर सण अत्यंत शांततेने पार पाडण्याचे उपस्थितांनी आश्वासने दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here