सोलापूर (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व व्यवस्था ठप्प झालेली असताना, नाट्य कलावंत व तंत्रज्ञ थिएटर बंद असल्यामुळे त्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागतआहे. हे कलावंत ज्यांनी सोलापूरची रंगभूमी समृद्ध करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला आहे,व करत आहेत.संपूर्ण उपजीविका नाट्य क्षेत्रावर असल्यामुळे सध्याच्या काळात त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूरचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस,माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, माजी नगरसेवक, मनोज प्रकाश यलगुलवार यांनी या गरजू नाट्य कलावंतांना एक छोटीशी मदत म्हणून आर्थिक सहाय्य केले. आपण या क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे या क्षेत्रातील गरजू कलावंतांसाठी खारीचा वाटा म्हणून मदत केली पाहिजे, या भावनेतून आपण हे करीत आहोत अशा भावना मनोज प्रकाश यलगुलवार यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मनोज प्रकाश यलगुलवार, प्रसिद्धीप्रमुख तिरुपती परकीपंडला,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूरचे प्रमुख कार्यवाह प्रा.जोतिबा काटे, तसेच सिकंदर शेख,श्रावण ढावरे,ओमप्रकाश श्रावण,रमेश श्रावण,विक्रम लोखंडे,धीरज परदेशी,राजा जाधव,गणेश मरोड,राजा वाघमारे, प्रकाश शिंदे,श्रेया माशाळ,लक्ष्मीनारायण रंगम आदी नाट्यक्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. शेवटी सोलापुरातील या कलावंतांच्या वतीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूर चे प्रमुख-कार्यवाह प्रा.जोतिबा काटे यांनी आभार मानले.






