आजीबाईंच्या मदतीला धावले सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकरे, संजय धनुरे

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – ऱाष्ट्रीय महामार्गावरील ईच्छादेवी मंदिरा जवळील सिध्दीविनायक हॉस्पिटल समोरून दुचाकीवरून जात असलेल्या आजीबाईंना चक्कर आल्याने त्यांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकरे संजय धनुरे हे तात्काळ मदतीसाठी धावून येऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आजीबाईंना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासल्याने पाटील परिवाराने त्यांचे आभार मानले.

दरम्यान ही घटना गुरूवार दि. 29 एप्रिल 2021 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. एरंडोल तालुक्यातील पिंपळ कोठा येथील वयोवृद्ध महिला कलाबाई मुरलीधर पाटील या त्यांचा मुलगा वासुदेव मुरलीधर पाटील याच्या दुचाकीवरून जळगावला येत असतांना ईच्छादेवी मंदिरा पुढील सिध्दीविनायक हॉस्पिटल समोरून जात असलेल्या दुचाकीवरील आजीबाईंना चक्कर येऊन त्रास होत असल्याचे लक्षात आले.

आजीबाईंची अडचण ओळखून सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकरे व संजय धनुरे यांनी त्यांना तात्काळ खाली उतरवून आजीबाईंना पाणी पाजून व बिस्किट खाऊ घालून धीर दिला. त्यानंतर थोडयावेळाने रिक्षा थांबवून आजीबाईंना त्यांच्या मुलास घरी रवाना केले. मनोज ठाकरे व संजय धनुरे यांच्या कार्याचे कौतुक उपस्थित नागरीकांनी देखील केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here