कल्पना कला केंद्रातर्फे गोरगरिबांना मोफत जेवण

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – कल्पना कला केंद्र व व्ही केअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, चिंचपोकळी ब्रिज (पश्चिम), येथे दुपारी ११ ते १२ या वेळेत रोज गोरगरीबांना मोफत जेवण चालू आहे.कोरोना पार्श्वभूमीवर कठीण परिस्थितीत आणि लॉकडाऊनच्या काळात, गोरगरिबांचे हाल होऊ नये, ते उपाशी राहू नयेत, या दृष्टीकोनातून कल्पना कला केंद्राच्या अध्यक्षा- कल्पना धारिया, यांच्या संकल्पनेतुन ‘फुडघर’ साकारण्यात आले आहे.

food-ghar-mophat-jevan

कल्पना धारिया यांचा महिला बचत गट आहे. बचत गटातील महिलांना एकत्रित करून गरजु गोरगरिबांना मोफत रोज दुपारी जेवण देण्याचा निर्णय घेतला‌. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन झाले. रोज मोलमजुरी करणाऱ्याना व हलाकीचे जीवन जगणाऱ्या कामगार बांधवाना मोफत व पोटभर जेवण देण्यात येते. रोज ६५ ते ७० लोकांना जेवणा चे वाटप केले जाते.त्यात भात, आमटी, भाजी, चपाती अथवा पाव यांचा समावेश असतो.

या प्रकल्पासाठीचा सर्व खर्च कल्पना धारिया स्वतः करीत असतात.तसेच महालक्ष्मी- रेसकोर्स येथे ही संस्थेच्या वतीने मदत कार्य सुरु आहे.तसेच लवकरच मुंबई सेंट्रल येथेही मोफत जेवण वाटपाचे कार्य सुरू करण्यात येणार असलयाचे संस्थेच्या अध्यक्षा कल्पना धारिया यांनी सर्व सांगितले. साईबाबा मंदिर सेवा समिती (आर्थर रोड), कानजीभाई मारू व बाबूभाई सुमरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेंच प्रतिक खुमाण, दिनेश महिडा, रंजना खुमाण, प्रकाश घारीया, नयना जीतया,आदी पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here