सीरमनंतर भारत बायोटेकने राज्यांसाठी लसीची किंमत २०० रुपयांनी केली कमी

नवी दिल्ली – सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता भारत बायोटेक कंपनीने राज्यांसाठी आपल्या लसीची किंमत कमी केली आहे. २०० रुपयांनी ही किंमत कमी करण्यात आली आहे. यामुळे राज्यांना आता ही लस ४०० रुपये प्रति डोस इतक्या दराने मिळणार आहे. भारत बायोटेकने निवेदन जारी करत ही माहिती दिलीय.

देशात करोना रुग्णांची वाढती संख्या आणि यामुळे दिवसेंदिवस बिघडत चाललेली स्थिती या पार्श्वभूमीवर लसीकरण हाच एकमेवर मार्ग असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पण केंद्र सरकारसाठी लसीचे दर वेगळे आणि राज्यांसाठी वेगळे ठेवणाऱ्या लस उत्पादक कंपन्यांविरोधात नाराजी निर्माण झाली. यानंतर केंद्राने लस उत्पादक कंपन्याना लसीच्या किंमती कमी करण्याची सूचना केली होती. अखेर सीरम इन्स्टिट्यूटने बुधवारी राज्यांसाठी आपल्या कोविशिल्ड लसीची किंमत १०० रुपयांनी कमी केली. आता कोविशिल्ड लस राज्यांना ३०० रुपये प्रति डोस दराने मिळणार आहे. यापूर्वी सीरमने राज्यांसाठी ४०० रुपये प्रति डोस इतका दर जाहीर केला होता. पण सीरमन खुल्या बाजारातील लसीचा दर कायम ठेवला आहे.

सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता भारत बायोटेकने आपल्या कोवॅक्सिन लसीची किंमत २०० रुपयांनी कमी केली आहे. यामुळे राज्यांना आता ही लस ४०० रुपये प्रति डोस दराने विकत घेता येणार आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सिनचा दर राज्यांसाठी यापूर्वी ६०० रुपये प्रति डोस इतका जाहीर केला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here