स्वस्त धान्य दुकानदारांचा 1 मे पासून संपाचा इशारा विमा कवच देण्याची मागणी

राज्यातील अनेक दुकानदार मृत्युमुखी

बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शहा) – खुलताबाद तालुक्यातील 89 स्वस्त धान्य दुकानदारांनी कोरोना च्या काळात एकही कार्डधारक धान्यापासून वंचित राहू नये व भूकबळी होऊ नये म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अन्नधान्य वाटप केले कोरोनाच्या काळात अनेक दुकानदार कोरोना मुळे मृत्युमुखी पडले तरीही दुकानदारांनी आपले अन्नधान्य वितरण सुरूच ठेवले.

मात्र शासन विमा कवच अथवा कोणतीही आर्थिक मदत करत नसल्याने राज्यातील व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी शासनाकडून सकारात्मक निर्णय येत नाही तोपर्यंत धान्याचे मागणी पत्र मंजूर करू नये व एक मेपासून कुठल्याच दुकानातून धान्य वाटप करू नये असा निर्णय घेतला आहे

खुलताबाद तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्री छबू कांबळे सचिव साईनाथ लोखंडे यांनी याबाबतचे निवेदन तहसीलदार खुलताबाद सुरेंद्र देशमुख यांना दिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here