मुंबई(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यकारिणीवर जनरल सेक्रेटरी म्हणून एस.ए.सिद्दीकी यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी जाहीर केली आहे.
संपूर्ण मुंबई शहरात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात सुरूच असून अनेक सामाजिक संस्था/राजकीय पक्ष/संघटनेतील नेते/कार्यकर्ते मुंबई मध्ये पक्षात दाखल होत आहे. राज्यातील सर्वच समाजघटकांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून काही तरी आपल्या जीवनात परिवर्तन घडेल ह्या अपेक्षेने असंख्य कार्यकर्ते प्रवेश करीत आहे.
एस.ए .सिद्दिकी है जय भारत सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थेचे संस्थापक असून या संस्थेमार्फत ते अनेक लोकोपयोगी कार्यक्रम करत असतात सिद्दीकी यांच्या प्रवेशामुळे मुंबईत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ताकद निश्चितपणे वाढणार असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे त्यांच्या निवडीमुळे मुंबई शहरातील समस्त कार्यकर्ते नेते यांनी त्यांचे स्वागत केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.सामाजिक जाणिवेचे भान ठेवून गोरगरीब समाजातील व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व मुंबई शहरात पक्षवाढीसाठी निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न करेल असे सिद्दीकी यांनी शेवटी सांगितले आहे.







