१ ऑगस्टपूर्वी प्रार्थनास्थळे उघडण्याची मुस्लिम समाजाची मागणी

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहरातील सुमारे २५ विविध मुस्लिम संघटनांनी एकत्रित येऊन शुक्रवारच्या नमाजनंतर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माननीय गृहमंत्री व माननीय गृहमंत्री अनिल देशमुख यांना पोलीस अधीक्षक जळगाव यांच्यामार्फत निवेदन दिले असून येणाऱ्या बकरी इदपासून म्हणजेच एक ऑगस्ट पासून सर्व समाजाचे, धर्माचे प्रार्थनास्थळ उघडावे अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे. बकरी ईदची नमाज ही ईद गाह मैदानावर व मस्जिद मधेच पढण्याची परवानगी देण्यात यावी अशी एकमुखी मागणी शासनास करण्यात आली.
सदर निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके यांनी स्वीकारून आपल्या भावना अत्यंत रास्त असून त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचू असे आश्वासन दोघी अधिकाऱ्यांनी दिले. सदर निवेदन शहर ए काझी मुफ्ती अतिकउर रहेमान यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी सोबत राष्ट्रवादी अल्पसंख्याक महाराष्ट्राचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक मानियार बिरादरीचे प्रदेश अध्यक्ष फारुक शेख,कुलजमातीचे अध्यक्ष सैयद चाँद, वहिदत ए इस्लामीचे डॉक्टर जावेद शेख,उलमा कौन्सिल चे मौलाना एजाज खान,ईद गाह ट्रस्ट चे अनिस शाह आदी उपस्थित होते.
निवेदनावर महाराष्ट्र शाह बिरदारीचे उपाध्यक्ष डॉ अमनुल्लाह शाह, जमात-ए-इस्लामी चे मुस्ताक मिर्झा, ताब्लिग जमातचे अख्तर पिंजारी, अहेलेवल सुन्नत जमात चे इक्बाल वजीर, महाराष्ट्र पीस अँड जस्टीस महमूद खान, वहिदत ए इस्लामी चे अतीक शेख, कुल जमाती कौन्सिलचे झाकीर शेख, इस्लामिक युथ फेडरेशनचे उमर शेख ,मलिक फाऊंडेशनचे नदीम मलिक, एस आय ओ चे प्राध्यापक सोहेल शेख, अक्सा बॉईज क्लब आमिर शेख, अल हिंद चॅरिटेबल ट्रस्ट अल्ताफ शेख, फर्स्ट एड फाऊंडेशनचे शकील हनांन,अल खैर ट्रस्ट युसुफ शाह, कादरिया फाऊंडेशनचे फारूक कादरी, डायमंड ऑफ ईकरा डॉक्टर रिजवान खाटीक, मरकज ग्रुपचे रईस शेख, सिकलिगर बिरादरीचे अन्वर खान व अझीझ खान, बागवान बिरादरीचे गुलाब बागवान, पिंजारी बिरादरीचे इकबाल पिंजारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here