अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण; आयसीयूमध्ये हलवले

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – करिना कपूर व करिश्मा कपूर यांचे वडील आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर सध्या कोरोनाशी झुंज देत आहेत. मुंबईतील कोकिळाबेन रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता 74 वर्षांच्या रणधीर यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.

रणधीर कपूर ७४ वर्षांचे असून त्यांना करोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कोकिलाबेन रुग्णालयाचे सीइओ आणि एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर डॉक्टर संतोष शेट्टी यांचं म्हणणं आहे की, ‘रणधीर कपूर रुग्णालयात दाखल झाले आहेत आणि त्यांच्यावर कोविड- १९ चे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या चांगली आहे.’यापूर्वी रणबीर कपूरला देखील करोनाची लागण झाली होती. परंतु, रणबीरने यशस्वीरीत्या करोनावर मात केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here