जुईनगर येथील जलकुंभात आढळेला मृतदेहाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – जुईनगर मधील जलकुंभात सापडलेल्या मृतदेह घटनेबाबत “महाराष्ट्र नवनिर्माण सेना” जुईनगर विभाग आक्रमक, आज सदर घटनास्थळी “जुईनगर चे विभाग अध्यक्ष “अक्षय भोसले”, प्रभाग क्र:- ८३ चे शाखा अध्यक्ष “मयुर कारंडे” आणि उपशाखा अध्यक्ष “सुशांत घोरपडे” ह्यांनी भेट दिली असता, त्यांच्या निदर्शनास आले की ज्या ठिकाणाहून १५ ते २० हजार लोकांना पाणी पुरवठा होतो अशा ठिकाणी खूपच निष्काळजीपणा आहे, तिथे सुरक्षारक्षक नाही, Cctv मागील बाजूस नाही, टाकीचे झाकण कोणीही सहज उघडेल अशा अवस्थेत आहे, व्यवस्थित कंपाऊंड नाही, एवढा हलगर्जीपणा महालपालिकेचा दिसून येतोय.

वरील सर्व त्रुटींची मागणी “महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने आयुक्तांना करण्यात आली आहे, आणि संबंधित अधिकारी वर कडक कारवाई झालीच पाहिजे ही देखील मागणी करण्यात आली आहे. संबंधित केस ज्या वरिष्ठ पो. निरीक्षक साहेबांच्या अंतर्गत आहे, त्यांची ही आज भेट घेतली ,त्यांच्या म्हणण्यानुसार मृतदेह कमीतकमी १५-२० दिवस टाकीत होता, PM रिपोर्ट आल्यानंतर अधिक माहिती मिळेल, तपास चालू आहे, आणि गेली २ दिवस जुईनगर मधील सर्व व्हाट्स ग्रुप वर एक मृतदेहाचा फोटो वायरल होतोय, पोलीस माहितीनुसार त्या फोटोचा ह्या घटनेशी काही ही सबंध नाही, तरी कोणी ही अशी अफवा पसरू नये

१५-२० हजार लोकांना ज्या ठिकाणाहून पाणी पुरवले जाते अशा ठिकाणी एवढा निष्काळजी पणा, एवढे दुर्लक्ष जर होत असेल तर संबंधित अभियंता तुम्ही तुमच्या जबाबदारीस सक्षम नाही म्हनून तुमचा राजीनामा द्या अशी मागणी “शाखा अध्यक्ष मयुर कारंडे आणि विभाग अध्यक्ष अक्षय भोसले ह्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here