शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथे कोविड १९ लसीकरण शिबीराचे आयोजन, नागरिकांचा प्रतिसाद

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – कोरोना लसीकरण मोहिम अंतर्गत शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कलसाडी अंतर्गत उपकेंद्र काथर्दे दिगर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा काथर्दे दिगर येथे ३० मार्च रोजी कोविड १९ शिबिराचे आयोजन करण्यात आले.

४५ वर्ष वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर राहून करून घेतले त्या बरोबर काथर्दे खुर्द आणि वाघोदा येथील नागरिकांना ही लसीकरण करण्यात आले. लस पुर्णपणे सुरक्षित असुन ४५ वर्षावरील सर्व ग्रामस्थांनी लसीकरण करून घ्यावे आणि कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन काथर्दे दिगर ग्रामपंचायत कडून करण्यात आले व त्याचबरोबर शिबिराच्या आयोजन बाबत समाधान व्यक्त केला व नागरिकांचे लसीकरणा बाबत असलेला गैरसमज दूर करण्यासाठी गावातील तरुणांनी विशेष सहकार्य केले.

katharde-digar-corona-vaccinatation

यावेळी कलसाडी आरोग्य केंद्राचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी वि. आर. पाटील, ग्रामसेवक एस. आर. सरदार, सरपंच गोरख भील, उपसरपंच गुलझार गिरासे, पोलीस पाटील कोमलसिंग गिरासे,जि.प.शाळेचे शिक्षक व ग्रामपंचायत सदस्य आदी कर्मचारीं उपस्थित राहून सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here