शिर्डी येथे दिव्यांग सहाय्यता निधीचे धनादेश वाटप

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आमदार राधाकृष्णजी विखे पाटील व खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगरपंचायत शिर्डी,ने स्वर्गीय डाॅ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या नावाने सुरु केलेल्या,दिव्यांग सहाय्यता कल्याण निधीचे वाटप करण्यात आले.

आर्थिक वर्ष 2020/21 साठी दिव्यांग सहाय्यता निधीचा धनादेश वाटप गुरुवार दिनांक 29/04/2021 रोजी करण्यात आले.गुरुवार दिनांक 29/04/2021 रोजी आठ दिव्यांग व्यक्तिंना व 45 बचत गटांचे (तीन संघ) यांना धनादेश वाटप करण्यात आले,ती रक्कम अंदाजे दोन लाख रुपये होती.शिर्डी मध्ये आर्थिक वर्ष 2020/21 मध्ये एकुण दोनशे (200) लाभार्थी व 45 बचत गटांचे (तीन संघ)ह्या सर्वांना लाभ झाला.सर्व लाभार्थींना आर्थिक वर्ष 2020/21 मध्ये एकुण रक्कम 15 लाख रुपयांचे धनादेश,शिर्डी नगरपंचायत तर्फे देण्यात आले.

दिव्यांग कल्याण निधीचे धनादेश लाभार्थींना लवकरात लवकर मिळावे म्हणुन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी प्रयत्न केले. धनादेश वाटप करण्याच्या वेळेस शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजीभाऊ गोंदकर पाटील, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र (सचिन) कोते पाटील, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे साहेब, नगरसेवक सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here