सोमराज कावळे यांच्यातर्फे शिर्डीतील गोरगरीब कष्टकरी, मजूरांना मोफत औषधांचा पुरवठा

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – लोकनेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ गोंदकर,खासदार डॉ सुजय दादा विखेपाटील, युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विक्रांत दादा पाटील,शिर्डी नगरपंचायत नगराध्यक्ष शिवाजी भाऊ गोंदकर ,जिल्हा उपाध्यक्ष अशोक भाऊ पवार ,उत्तर नगर युवा मोर्चा अध्यक्ष श्रीराज डेरे, शिर्डी शहर भाजपा अध्यक्ष सचिन भाऊ शिंदे व भाजयुमो प्रदेश सदस्य श्री. किरण जी बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अहमदनगर उत्तर यांच्या सहकार्याने एका नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

फेब्रुवारी २०२० मध्ये आपल्या देशावर कोरोनाचे संकट आले. पर्यायाने संपूर्ण देशाला इच्छा नसतानाही लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. देशाची स्थिती गंभीर होत चालली होती. लॉकडाऊन वाढत गेले. अनेक महिन्यानंतर कोरोनाची परिस्थिती थोडीशी निवळली आणि लॉकडाऊन शिथिल झाले. परंतु याकाळात अनेकांचे आर्थिक कंबरडे मोडले. हातमजुर, रोजंदारी वर काम करणारे कष्टकरी, बेरोजगार यांचे प्रचंड हाल झाले. त्यातून सावरत होतोच की दुसरी आणि पहिल्या लाटेपेक्षा अधिक भीषण अशी कोरोनाची लाट आली आणि हे लोकं आणखीच आर्थिक गर्तेत गेले. तसेच मागे साईनाथ रुग्णालय परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली असता सोमराज भिवसेनराव कावळे, जिल्हा सचिव, भारतीय जनता युवा मोर्चा, अहमदनगर जिल्हा तथा तालुकाध्यक्ष, अखिल भारतीय वंजारी युवा संघटना, राहाता तालुका यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या उपक्रमात तेव्हा औषधच्या रूपाने मदतीचा हात दिला होता.

आज लोकांची परिस्थिती अत्यंत भयंकर अशी झाली आहे. दोन वेळेच्या जेवणाचे प्रश्न डोळ्यासमोर उभा आहे. अश्यावेळी दैनंदिन औषधोपचार घेणाऱ्या, किंवा औषधांची गरज भासणाऱ्या लोकांचे काय हाल होत असतील! तेव्हा शिर्डीतील गरीब, मजूर, रोजंदारीवर जगणारे, कष्टकरी, वंचित, निराधार वृद्ध व महिला या सर्वांना लागणारे प्राथमिक स्वरूपाचे औषधे श्री.कावळे यांच्यामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हा उपक्रम पोलिस बांधवांकरितादेखील असल्याचे यावेळी बोलताना जिल्हा सचिव, भारतीय जनता युवा मोर्चा, अहमदनगर जिल्हा तथा तालुकाध्यक्ष, अखिल भारतीय वंजारी युवा संघटना, राहाता तालुका सोमराज भिवसेनराव कावळे यांनी सांगितले.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे,
१)श्री.नरेश सुराणा
सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा उत्तर नगर जिल्हा
मो.9511552525

२)श्री.गणेश जाधव
जिल्हा सचिव – भाजपा युवा मोर्चा उत्तर नगर
मो.7020025757

३)श्री.शंकर गोंदकर
जिल्हा उपाध्यक्ष – भाजयुमो उत्तर नगर
मो.9511613535

४)श्री.रोहित वाकचौरे
जिल्हा उपाध्यक्ष – भाजयुमो उत्तर नगर
मो.8390021444

५)श्री. जावेद शाह
(सामाजिक कार्यकर्ते)
मो.8308964364

६)श्री.सुजित राऊत
(सामाजिक कार्यकर्ते)
मो.9766991103

७)श्री.अमित कुटे
मो.9511505757

८)श्री शिवाजी फुंदे
मो.8698636878

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here