कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेबाबत शिर्डी येथे जनजागृती मोहीम

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) -कोराना विषाणू (कोव्‍हीड -19 ) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाचे वतीने वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश/निदेशाचे पालन करण्‍याचे दृष्‍टीने नगरपंचायत मार्फत आवश्‍यक ती कार्यवाही करणेत येत असल्‍याचे नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सांगीतले तसेच नागरीकांमध्‍ये जागृती करणेत येत आहे.

महाराष्‍ट्र शासनाने दिनांक 1 मे 2021 रोजी महाराष्‍ट्र दिनाचे औचित्‍य साधून 18 वर्षावरील नागरिकांसाठी कोराना विषाणू (कोव्‍हीड -19 ) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्‍याचे निश्‍चीत केलेले आहे. ही बाब अतिशय गौरवास्‍पद आहे. शिर्डी शहराची लोकसंख्‍या सुमारे 45000 इतकी असून त्‍यामध्‍ये 18 वर्षावरील नागरिकांची संख्‍या मोठया प्रमाणावर आहे. शहरात एकाच ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र ठेवल्‍यास लसीकरणाचे वेळी मोठया प्रमाणावर गर्दी होवून कोरोना विषाणूचा संसंर्ग वाढण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्‍हणून नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर यांनी , उपविभागीय अधिकारी शिर्डी भाग शिर्डी गोविंद शिंदे, यांना निवेदन देवून शहरातील लसीकरण मोहीमेचे ठिकाणची गर्दी टाळणेसाठी शिर्डी शहराची तीन ते चार विभागात विभागणी करुन नागरीकांना कोणताही त्रास न होता सुलभपणे लसीकरण केंद्रावर पोहोचणे शक्य होईल अशा रितीने शहरात वेगवेगळया ठिकाणी (उदा- जिल्‍हापरिषद प्राथमिक शाळा, श्री साईनाथ माध्‍यमिक विदयालय व आदर्श माध्‍यमिक विदयालय ) लसीकरण केंद्र सुरु करणेबाबत निवेदनात नमुद केलेले आहे..

सदर मोहीम यशस्‍वी करणेसाठी श्री.साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डी व शिर्डी नगरपंचायतचा कर्मचारी वर्ग शासनाचे आरोग्‍य विभागाचे कर्मचा-यांचे मदतीसाठी उपलब्‍ध करुन देता येईल. वेगवेगळे ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु केलेस नागरिकांची गर्दी होणार नाही. त्‍यामुळे कोरोना विषाणूचा संसंर्ग होणार नाही. यासाठी कमीत कमी 3 लसीकरण केंद्र सुरु करणेबाबतही निवेदनात नमुद केलेले आहे. सदर निवेदन प्रसंगी नगराध्‍यक्ष श्री शिवाजी गोंदकर यांचेसह भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर मुख्‍याधिकारी काकासाहेब डोईफोडे, भाजपा शहर अध्‍यक्ष सचिन शिंदे , नगरसेवक अभयराजे शेळकेपाटील, गटनेते अशोक गोंदकर , मंगेश त्रिभुवन , सुजित गोंदकर , विजय जगताप, दत्‍तात्रय कोते, रविंद्र गोंदकर, रविंद्र कोते, अशोक गायके आदी उपस्‍थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here