चोपडा (विशेष प्रतिनिधी मिलिंद वाणी) – आज दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी गिरीषभाऊ महाजन, खा.श्रीमती.रक्षाताई खडसे, जिल्हाध्यक्ष.आ.राजुमामा भोळे, अनिकेत विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा यांच्या वतीने चोपडा शहरातील आसकरण ताराचंद जैन रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात रक्ताचा प्रचंड भिषण तुटवडा निर्माण झालेला असताना गरजवंताना वेळेवर रक्ताचा पुरवठा उपलब्ध होत नाही आहे. त्या अनुषंगाने युवा मोर्चा यांच्या वतीने कार्यकर्त्यांना व जनतेला रक्तदानाचे आवाहन केले होते.त्यांचा आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी व जनतेने शिबिरास उपस्थित राहून रक्तदान केले. शिबीरात एकुण १०५ रक्ताचा बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष पंकज पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, माजी सभापती आत्माराम माळके, जेष्ठ नेते प्रदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, राजु शर्मा, डॉ. नरेंद्र अग्रवाल, ,रंजनाताई नेवे, हिम्मतराव पाटील, चंद्रकांत धनगर, पिंटु पावरा, विजय बाविस्कर, शुभम चौधरी,चुचाळे उप सरपंच कार्यालयमंत्री मोहित भावे, लक्ष्मण पाटील, दीपक पाटील, भरत पाटील, रंजीत पाटील, विवेक गुजर,अमित तडवी, युवा मोर्चा सरचीटणीस कृष्णा बाविस्कर, बापूराव पाटील, चेतन सावकारे, किशोर पाटील. व आदी कार्यकर्ते सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन उपस्थित होत.






