‘राधे’च्या गाण्यात जॅकलीनच्या हॉट अदा

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – आपले पहिले गाणे ‘सिटी मार’च्या यशानंतर, ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चे निर्माते आणखी एक डांस नंबर ‘दिल दे दिया है’ सादर करण्यास सज्ज झाले आहेत. या गाण्याचा टीज़र प्रदर्शित करण्यात आला असून गाण्याची एक झलक सादर केली आहे.

jacqueline-fernandez-in-radhe-song

टीजर जॅकलीन फर्नांडिसपासून सुरु होते. त्यानंतर एक भव्य सेट आपल्या नजरेस पडतो ज्यावर हे गीत चित्रित करण्यात आले आहे. टीज़रमध्ये अभिनेत्रीने एक एथनिक ड्रेसमध्ये दाखवण्यात आले असून तो ती अत्यंत सुंदरपणे कॅरी करताना दिसते आहे. मागील काही वर्षांमध्ये आपण जॅकलीनला अनेक डांस नंबरमध्ये पहिले आहे मात्र, यात ती त्या सगळ्यांहून अनोखी दिसते आहे. गाण्यात आपण सलमान आणि जॅकलीनला लाईव्ह बीट्सवर थिरकताना पाहू शकतो, जे आपल्या परफॉर्मन्सला खूप एन्जॉय करत आहेत. सलमान आणि जॅकलीनची जोडी नेहमीच चमकदार राहीली आहे आणि असेच काहीसे ‘दिल दे दिया है’ मध्ये बघण्यास मिळत आहे.

गाण्यामध्ये रणदीप हुडाच्या रुपात एक सरप्राइसिंग ट्विस्ट आहे मात्र, त्यासाठी तुम्हाला हे गाणे पहावे लागेल. हिमेश रेशमियाने या गाण्याला संगीत दिले असून शब्बीर अहमद याचे गीतकार आहेत. हे गाणे, कमाल खान आणि पायल देव यांनी गायले असून शबीना खानने कोरियोग्राफ केले आहे. सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर १३ मे ला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here