मैंदर्गी नगरपरिषदेचे निंगदळी गल्लीकडे दुर्लक्ष; नागरिकांची पाण्यासाठी वणवण

अक्कलकोट (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – मैंदर्गीत खूप मोठया प्रमाणात पाण्याचा साठा असून सुद्धा निंगदळी गल्लीचे नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. एक दिवसा आड पाणी पुरवठा करतात तरी सुद्धा नळाला पाणी येत नाही.

मैंदर्गी नगरपालिका च्या कर्मचाऱ्यांना सांगूनसुद्धा ते या विषयावर दुर्लक्ष करत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात लाईट आल्यावर नळाला डायरेक्ट मेन पाईपला मोटर लावून पाणी ओढत आहेत मोटर लावल्या मुळे पुढच्या गल्लीला नळानां पाणी येत नाही मैंदर्गीचे मुख्यधिकारीनां सांगितले तरी त्यांनी मोटर लावण्याऱ्यांवर कारवाई केली नाही सध्या मैंदर्गी नगरपालिकाची स्थिती खूप बिकट होत चाली आहे तरी मुख्यधिकारी असे होऊ देउ नये, असे आवाहन नागरिकांनीं केले आहे.

maidargi-nagarparishad

लॉकडाऊनच्या काळात जसे तुम्ही घराचे कर नळाचे कर वसुली केली आहे त्याच प्रमाणे तुम्ही निंगदळी गल्लीला नळाला पाणीपुरवठा करावा. संतापून नागरिक आमची गल्लीसुद्धा नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये येते असे बोलत आहेत. कृपया नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. जे नागरिक नळाला मोटर लावतात त्यांच्या मोटर जप्त करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.

मैंदर्गी नगरपरिषदच्या अधिकारी व कर्मचाऱ्यानी लवकरात लवकर योग्य मार्ग काढून कोरोनाच्या या कठीण काळात पाण्यासाठी नागरिकाना भटकंती करण्यास भाग पाडू नये अशी विनंती या नागरिकानी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here