महाड मध्ये पोलीस बांधवांना मिठाई वाटून महाराष्ट्र दिन साजरा

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – दि. १ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त , “महाराष्ट्र संरक्षण संघटना , महाराष्ट्र राज्य” ,संलग्न “मी मराठी एकीकरण समिती” तर्फे महाड शहर , महाड तालुका, महाड एमआयडीसी येथील सर्व पोलीस बांधवांना मिठाई वाटप करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

एमआयडीसी मधील नवीन पोलिस निरीक्षक मा.खाडे यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच सर्व पोलीस बांधव आपल्यासाठी या कोरोना काळात सदैव कार्यरत आहेत, हा महाराष्ट्र दिन त्यांच्यासोबत साजरा केला.

mithai-watap

यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष अक्षय सुधीर भोसले, सुहास जी साळुंखे ,वैभव जी सोनावणे , करण जी साळुंखे ,सतीश जी कोरपे आदी मान्यवर आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here