एरंडोल (निलेश पाटील) – कोव्हीड १९ च्या प्रार्दूभावाच्या निमिताने फक्त ऑपरेशन थिएटर व अतिदक्षतागृहांत काम करणाऱ्या डॉक्टरांपर्यंत व आरोग्य सेवकांपर्यंत परिचित असलेले हे यंत्र आता मात्र छोट्या क्लिनिक पासून सोसायटी , कॉलनी व घरा घरा पर्यंत पोहोचले !
कोव्हीड १९ अर्थात कोरोना च्या प्रार्दूभावामुळे शरीरातील महत्वा च्या अवयवांपैकी एक असलेल्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो !
परिणामी शरीरातील , रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते ! ( ऑक्सिजन )
पल्स ऑक्सिमीटर हे यंत्र अश्या परिस्थितीत शरीरातील प्राणवायु कमी असल्यास ते दर्शवितो , महत्वाचे म्हणजे दम लागणे , अस्वस्थ वाटणे , ओठ व हाताची बोटे निळे पडणे ह्या प्राणवायू कमी झाल्यावर रुग्णास जाणविणार्या लक्षणाआधी हे यंत्र त्या रुग्णास प्राणवायूचे प्रमाण किती कमी झाले ते सांगत असते !
म्हणूनच कोरोनाच्या लढ्यात जे रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत , कोरोनाची सॊम्य लक्षणे असून घरीच आहेत किंवा विविध पूर्व तपासणी शिबिरात किंवा प्रतिबंधीत क्षेत्रात तपासणीसाठी ह्या यंत्राची फार मदत होते !
१: सर्वसाधारण पणे हाताच्या मधल्या बोटात हे मशीन लावतात, २ : काही सेकंद बोट स्थिर झाल्यानंतर रिडींग घ्यावे, ३: ह्या यंत्राच्या माध्यमातून ह्रदयाचे ठोके ( पल्स रेट ) , व SPO2 म्हणजे प्राणवायूचे प्रमाण हे दोन रिडींग कळतात ! त्यामुळे कोणते रिडींग काय दर्शविते ते समझून घेणे महत्वा चे आहे, ४: सर्वसाधारणपणे हृदयाचे ठोके हे ६० ते १०० पर्यंत असतात !( वयोगट , गोळ्या , व्यायामाचे शरीर व घाबरल्याच्या स्थितीत ह्यात बदल अपेक्षित असतात ), ५: महत्वाचे म्हणजे SPO2 अर्थात शरीरातील प्राणवायूचे प्रमाण !
सर्वसाधारण पणे निरोगी व्यक्तिचे हे प्रमाण ९६ ते १०० ह्या प्रमाणात असावे
९० ते ९५ असेल तर त्या व्यक्तीस सावधान होऊन डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे, जर हेच प्रमाण ९० च्या खाली असेल तर लगेचच ज्या ठिकाणी ऑक्सिजन ची सोय आहे अश्या ठिकाणी दाखल झाले पाहिजे. ह्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की इतर श्वसनविकाराप्रमाणे प्राणवायूचे प्रमाण कोरोनामध्ये बऱ्यापैकी ( ६० ते ८० इतके )कमी येऊन ही रुग्ण हे स्थिर असतात व ते. बरे होण्याचे प्रमाण हि चांगले असते ,त्यामुळे अश्या स्थितीत घाबरून न जाता लगतच्या कोव्हीड केअर सेंटर मध्ये ( ऑक्सिजन ची सुविधा असलेल्या ) धाव घेतली पाहिजे
६ : ज्या व्यक्तीना दमा , अस्थमा , इतर फुफ्फुसाचे आजार , रक्त क्षय , रक्त न होण्याचे आजार असतील त्यांचे प्राणवायूचे प्रमाण कमी असते त्यामुळे सुरुवातीलाच बेसलाईन रिडींग ह्या लोकांनी घेऊन त्याप्रमाणे निरीक्षण केले पाहिजे !
७ : ज्या व्यक्तीनी नखाना रंग किंवा पॉलीश केली असल्यास , कुत्रिम नख असल्यास , बोटे अतिथंड असल्यास व हात स्थिर नसल्यास रिडींग चुकीचे येऊ शकते अश्या वेळेस एकदम घाबरून न जाता दुसरीकडे यंत्र लावून बघता येते !
८ :हे यंत्र टिकावू नसते , त्यामुळे सुलभतेने वापरावे लागते !( किंमत १००० ते २००० रुपये )
रिडींग अचानक कमी आल्यास घाबरून न जाता घरातील इतर सदस्यांचे ( सॅनिटेशन करून )रिडींग घेऊन खात्री करून घ्यावी , जेणे करून यंत्र व्यवस्थित काम करते आहे कि नाही हे समझते !
९ : सर्वसाधारणपणे होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांनी दिवसातून दोन ते चार वेळा हे रिडींग घेऊन त्याची नोंद केली पाहिजे !
१० सायलेंट हायपॉक्सिया बऱ्याचवेळा spo2 चे प्रमाण चांगले दिसते परंतु नंतरच्या दोन तीन दिवसांनी शरीरातील प्राणवायूचे प्रमाण अचानक कमी होते ह्या साठी रिडींग अश्या पध्दतीने घेतल्यास उत्तम ::
१५ मिनिटे शांत बसून नंतर spo2 ची नोंद करावी , त्यानंतर ६ मिनिटे नेहमीच्या वेगात चालावे व नंतर परत spo2 चे नोंद करावी ह्या दोघी नोंदीत ६ ते ८ चा फरक असेल किंवा नंतरचे रिडींग एकदम कमी आल्यास जागरूक राहावे हीच ६ मिनिटे वॊक टेस्ट आहे !
११: एकंदरीत हे पल्स ऑ क्सिमीटर हे यंत्र छोटे असले तरी महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन ते उपलब्ध करून आपल्याजवळ ठेवले पाहिजे, असे सुखकर्ता फाऊंडेशनच्या डॉ. गीतांजली ठाकूर, डॉ नरेंद्र ठाकूर यांनी दिली.







