- डॉ.शुभदा जोशी यांनी केले मार्गदर्शन
पनवेल (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – दि 1/5/2021 रोजी पुरोगामी पत्रकार महाराष्ट्र संघाच्या महिला प्रदेश अध्यक्ष सुनिता व महाराष्ट्र राज्य महीला सचिव म्हणून तेजश्री विसपुते,तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोगामी पत्रकार संघातील सर्व महिला पदाधिकारी व सर्व महिला सदस्य यांची झुम व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मिटिंग घेण्यात आली.
पुरोगामी पत्रकार संघातील सर्व महिला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात अग्रेसर आहेत.कोणी डाॅक्टर आहे, …तर कोणी शिक्षिका..,कोणी पत्रकार आहे…तर कोणी वकील,या सगळ्यांच्या ज्ञानाचा किंवा कौशल्यांचा उपयोग सगळ्यांना मिळुन घेता यावा,म्हणून आजची ही मिटींग घेण्यात आली.
आजच्या ह्या मिटींगला मुख्य मार्गदर्शक म्हणून डाॅ शुभदा जोशी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या कोरोना संदर्भातील प्रश्नांची उत्तरे देऊन सर्व महिलांना कोरोना संदर्भात मार्गदर्शन केले. आजच्या ह्या मिटींगला महिला प्रदेश अध्यक्ष सुनिता तोमर,महाराष्ट्र राज्य महीला सचिव तेजश्री विसपुते,डाॅ शुभदा जोशी,वैशाली गायकवाड,कल्पना जी,मृण्मयी मंगेशकर,तृप्ती धवन,पल्लवी जी,प्राची भगत,व पुरोगामी पत्रकार संघातील इतर महिला उपस्थित होत्या. पुरोगामी पत्रकार संघातील सर्व महिलांच्या उपस्थित हि मिटींग अत्यंत उत्कृष्ट पणे संपन्न झाली. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी सांगितली.






