सलग चौथ्या दिवशीही मुंबईतील लसीकरण केंद्र राहणार बंद

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेले मुंबईतील लसीकरण आता आजदेखील (3 मे 2021) म्हणजेच सलग चौथ्या दिवशीही बंद राहणार आहे. मुंबई महानगरपालिके ने या संदर्भात माहिती दिली आहे. 45 वर्षांवरील नागरिकांना उद्या कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेता येणार नाहीये. लसींचा तुटवडा असल्याने उद्या लसीकरण होऊ शकणार नाहीये.

मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व लसीकरण केंद्र सलग चौथ्या दिवशी बंद राहणार आहेत. ज्या लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यात येते असे केंद्र लशींच्या अभावी बंद राहणार आहेत.

45 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लस मिळणार नाहीये तर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी मुंबईतील केवळ 5 लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत. तसेच ज्या नागरिकांनी आपली नोंदणी केली आहे आणि ज्यांना लस घेण्याच्या संदर्भात मेसेज आला आहे त्यांनाच लस दिली जाणार आहे.

त्यामुळे मुंबईकरांनी उद्या लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना एकूण 5 केंद्रांवर लस देण्यात येणार आहे त्यामध्ये सायन, राजावाडी रुग्णालय, बीकेसी लसीकरण केंद्र, कूपर रुग्णालय, सेव्ह हिल्स रुग्णालय येथील केंद्राचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here