सांगली येथे दोन गटांमध्ये राड्यानंतर एकाचा हृदयविकाराने मृत्यू

सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – येथील गवळी गल्लीत शनिवारी रात्री दोन गटांत शिवीगाळ आणि मारामारी करीत राडा झाला. त्यानंतर सिराज बाबासाहेब आत्तार (वय 35, रा. पेठ भाग, गवळी गल्ली) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

याप्रकरणी आयुब सय्यद हसन सय्यद (वय 53, रा. शिवशंभो चौक) यांच्यासह एक अल्पवयीन आणि इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी समीर बाबासाहेब अत्तार (वय 42, रा. पेठभाग, गवळी गल्ली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : गवळी गल्ली येथे फिर्यादीचा व संशयिताचा मुलगा शनिवारी क्रिकेट खेळत होती. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली. दोन्ही गटातील लोक त्या ठिकाणी आले. दोन्ही गटात जोरदार मारामारी झाली. या मारहाणीत त्यावेळी सिराज हे जखमी झाले. ते बेशुद्ध झाल्याने त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी सिराज यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे समीर यांनी संशयिताविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसारपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here