बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शहा) – खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील तरुणाने गावाजवळच्या शेतातील राहत्या घरी गट क्रमांक 740 येथे वास्तव्यास असलेल्या तरुणाने शेतकऱ्यांने शुक्रवारी रात्री पत्र्याच्या शेड मधील लोखंडी अँगल ला गळफास घेऊन आत्महत्या केली दादाराव जनार्दन नलावडे वय 35 असे मयत शेतकऱी.तरुणाचे नाव आहे
दादाराव व्यवसायाने शेतकरी व मोलमजुरी करणारा होता परंतु दादाराव जनार्धन नलावडे यांच्यावर काही खाजगी बँका व काही शासकीय बँकेचे कर्ज थकीत होते त्यातच जेमतेम शेती असल्याने दादाराव नलावडे यांच्याकडे बँकांनी वसुलीचा तगादा लावला त्याच्यामुळे दादाराव नलावडे यांची मनस्थिती खालावली गेली असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलत शेतकऱ्याने दिनांक 30 /4/ 2021रोजी शुक्रवारी फाशी घेऊन आत्महत्या केली वस्ती शेजारचे आसाराम नलावडे यांनी सकाळी हे दृश्य पाहताच गावातील संजय मनोहर नलावडे यांना ही माहिती दिली व दादा सांगलीच्या पोलिस चौकीला ही माहिती दिली आत्महत्याची खबर मिळाल्यावरून सकाळीच जमादार संजय जगताप कोल्हे आमदार योगेश नरोडे संतोष पुंड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन यांनी पंचनामा केला
पोलिसांनी दादाराव नलावडे याला फासावरून उतरून बाजार सावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले तेथे असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एमपी मेहेर यांनी तपासून मृत घोषित केले या शेतकऱ्याच्या पश्चात वृद्ध आई पत्नी व तीन मुले असा परिवार आहे






