डीएमकेच्या विजयानंतर महिलेनं मंदिराबाहेर कापली जीभ; केला होता असा नवस!

रामानाथापूरम (तामिळनाडू) – येथे द्रविड मुन्नेत्र कडगमच्या मोठ्या विजयानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. रामानाथापूरम जिल्ह्यातील डीएमके समर्थक असलेल्या एका महिलेने सोमवारी सकाळी एका मंदिराबाहेर आपली जीभ कापली. या महिलेने एका मंदिरात तामिळनाडूनत 2021मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेचे सरकार आल्यास आपण आपल्या जिभेचा बळी देऊ, असा नवस केला होता.

या 32 वर्षीय महिलेचे नाव वनिथा असल्याचे समजते. परमाकुडी येथे राहणाऱ्या वनिथाच्या पतीचे नाव कार्तिक असे आहे. डीएमकेला राज्यात बहुमत मिळाल्यानंतर वनिथा या मुथाल्लन येथील मंदिरात पोहोचल्या. येथील मूर्ती समोर जीभ कापून नवस पूर्ण करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतही सध्या अनेक निर्बंध लागू आहेत. मंदिरे तथा इतर धार्मिक स्थळांत जाण्यावर बंदी आहे. यामुळे मंदिराचे गेट बंद असल्याने वनिथा यांनी मंदिराबाहेरच आपली जीभ कापली. मंदिराच्या गेटवरच जीभ ठेवल्यानंतर वनिथा या मोठ्या प्रमाणावर ब्लिडिंग झाल्याने बेशुद्ध झाल्या.

यानंतर काही लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तामिळनाडूतील अनेक लोक राजकीय नेत्यांवर प्रचंड प्रेम करतात. येथे विजयानंतर मुंडन करणे ही तर सामान्य गोष्ट आहे. डीएमके आणि एआयडीएमके, तामिळनाडूतील या दोन्ही मुख्य राजकीय पक्षांत मुख्य नेत्यांवर प्रमाणाबाहेर प्रेम करणारे समर्थक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here