परतूर (इम्रान कुरेशी) – तालुक्यातील आंबा येथील गणेश नारायण तमाखे वय 24 वर्ष या तरुणाचा गावात रात्रीच्या वेळी अनोळखी
इसमाने डोक्यात दगड किंवा अज्ञात शस्त्राने मारून खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात एकाच खळबळ उडाली.
गणेश हा आंबा गावात सलून चा व्यवसाय करत होता. बुधवारी दिवसभर काम करून साडेपाच वाजेच्या सुमारास घरी आला. त्याचा गावातील मित्र लक्ष्मण भगवान मावकर सहा वाजता त्यांच्याकडे घरी आला व म्हणाला चल बाहेर जाऊ दोघे बाहेर चालत गेले. रात्री अकरा वाजे पर्यंत घरी आला नाही. रात्री दीड वाजता लक्ष्मण येऊन गणेश घरी आला का असे त्याच्या आईला विचारात म्हणाला त्याच्या अंगावर कोणते कपडे आहेत. तेव्हा त्यांच्या आईने अंगावरील कपड्याचे वर्णन सांगितले. आईला लक्ष्मण त्याच्या घराजवळ नेले. तिथे गणेश हा नालीत पडलेला होता. व त्याचे डोक्यावर जखम व पाठीवर दगड पडलेला होता. डोक्यात दगड व अज्ञात शस्त्राने फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यात मारून गणेश याला जीवे ठार मारून त्यांच्या खून केला. घटनेचे कारण समजू शकले नाही.
मयत गणेशला सलूनची दुकान सुरू करण्यासाठी त्याच्याजवळ खिशात पंधरा हजार रुपये होते. व मोबाईल पैसे गायब आहेत. या घटनेची माहिती मिळताच गावालील लोकांनी सरकारी दवाखाना परतुर येथे नेले. त्याठिकाणी साडेचार वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी तो मयत घोषित केले. मयत गणेश यांच्या वडील नारायण नामदेव तमाखे वय 60 वर्ष यांच्या फिर्यादी वरुण अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे हे करीत आहे.







