धरणगांव (योगेश पी पाटील) – येथील पोलीस कार्यालयात पोलीस निरीक्षक श्री पवन देसले सो यांच्या अध्यक्ष तेखाली दिनांक २४/७/२०२० रोजी बैठक संपन्न झाली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी हिंदू व मुस्लिम बांधवांनी येणारे सण बकरी ईद,रक्षाबंधन व विविध सण खेड़ीमेडिचा वातावरणात साजरे करून कोरोना या विषाणू वर आपल्याला मात करायची आहे. मुस्लिम बांधवांनी आप आपल्या घरी ईद साजरी करून हा उत्सव दर वर्षी प्रमाणे एकत्रित रित्या मज्जित मध्ये जाऊन साजरा न करता घरीच राहून साजरा करावा व हिंदू बांधवांनी सुद्धा सर्वच येणारे सण एकत्रितपणे गर्दी करून व सार्वजनिक ठिकाणी साजरे न करता घरोघरी साजरे करण्याचे आव्हान केले व कोरोना या विषाणूंचा नायनाट करण्यासाठी शासनांच्या नियमांचे पालन करावे.
सदर बैठकीत अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी प्रा.डी.आर.पाटिल,श्री ज्ञानेश्वर महाजन, भानुदास आप्पा विसावे,पी.एम.पाटील.सर,शीरीश आप्पा बयस,श्री चंदन पाटिल,आर.डी.महाजन सर,उपनगराध्यक्ष विलास महाजन,नगरसेवक ललित येवले,गुलाब मराठे,मनोज कंखरे,पांडुरंग सातपुते,हाजी रफिक शेख,नजमुद्दिन खाटीक,शब्बीर अहमद,सलीम इसाख,नगर मोमीन,सज्जद अली,राजेंद्र वाघ,मनोज कंखरे,कन्हैया रायपूरकर,गौरव चव्हाण,रामचंद्र महाजन,विकास लंबोळे,शब्बीर शेख,दिलीप माळी आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक पोलीस निरीक्षक श्री.पवन देसले सो यांनी केले तर आभार मा नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी मानले.







