शिवाजी नगर डी.बी.जैन रुग्णालयात कोविड लसीकरण सुरळीत व्हावी व लसीकरण केंद्र वाढवावे अशी धर्मरथ फाउंडेशनतर्फे मागणी

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – शिवाजी नगर डी.बी.जैन रुग्णालयातमध्ये लसीकरण केंद्र सुरू व्हावे या करीता धर्मरथ फाउंडेशन तर्फे विनायक पाटील यांनी २७ मार्च २०२१ रोजी मनपा प्रशासनाला मागणी केली होती आणि ती मागणी योग्य असून ती प्रशासनाने मान्य करून डी.बि रुग्णालयात लसीकरण चालू ही केले परंतु कालांतराने लसीचा पुरेसा साठा नसल्या कारणाने ते बरेच काळ बंद होते

त्या कालावधीमध्ये सिविल हॉस्पिटल,शाहू नगर हॉस्पिटल आणि चेतनदास रुग्णालयात लसीकरण चालू होते मग शिवाजी नगरला तो साठा का येत नाही हा प्रश्न निर्माण होतो आणि नागरिकांना सुद्धा रुग्णालयातून नीट मार्गदर्शन कुणी करत नाही शिवाजी नगर येथील नागरिक सकाळी सहा वाजल्या पासून नंबर लावतात आणि दहा वाजता कळते की लस येणार नाही म्हणून हे कुठे तरी थांबायला पाहिजे येणार नसल्यास कुठलीही माहिती नीट देत नाही हीच मागणी आम्ही धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून विनायक पाटील मनपा प्रशासनाला विनंती केली आहे.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मुबलक प्रमाणात का होई ना पण तुम्ही आम्हला लस द्या करणं शिवाजी नगर प्रभाग हा खूप मोठा असून येथील पुलाचे काम चालू आहे त्या मुळे नागरिकांना दुसऱ्या रुग्णालयात जाऊन लस घेणं खूप कठीण होत आहे.आमची मागणी आहे की लौकरात लौकर प्रशासनाने लस उपलब्ध करवी आणि शिवाजी नगर मध्ये लसीकरण केंद्र वाढवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here