स्वच्छता कामगारांचे पगार देता येत नसेल तर राजीनामा दया:- शिर्डी महाविकास आघाडी

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आज मंगळवार रोजी शिर्डी नगरपंचायतिने स्वछता कर्मचाऱ्यांचे चार महिन्याचे पगार थकवल्यामुळे महाविकास आघाडीच्यावतीने सत्ताधारी भाजपाचे नगराध्यक्ष शिवाजी भाऊ गोंदकर आणि मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना जाब विचारण्यात आला .

याप्रसंगी शिवसेना नेते कमलाकर कोते,राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश गोंदकर,काँग्रेसचे सचिन चौगुले, संजय शिंदे,विजय जगताप,सचिन कोते,उमेश शेजवळ,सुनील गोंदकर,दत्तूबाबा त्रिभुवन,अमृत गायके,अमोल गायके,सुरेश आरणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.सत्ताधारी गटाकडून भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,शहर अध्यक्ष सचिन शिंदे,सुजित गोंदकर,पप्पू गायके उपस्थित होते.याप्रसंगी सत्ताधारी गटात आणि महाविकास आघाडी पदाधिकारी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.याप्रसंगी बोलताना कमलाकर कोते म्हणाले स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांचे चार महिन्यांचे पगार करण्यात यावे आणि त्यांना एक महिन्याच्या किराणा नगरपंचायत तर्फे देण्यात यावा.अंत्यविधी च्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोविड विमा कारावा आणि त्यांचा पगार डबल करण्यात यावा.अशी मागणी केली असता नगराध्यक्ष यांनी आज एक महिन्याचा पगार देऊ आणि उर्वरित दोन महिन्याचा पगार बी.व्ही.जी. कंपनी कडून घेऊन देऊ.

राजेंद्र गोंदकर म्हणाले की सरकार महाविकास आघाडीचे आहे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत त्यांच्याकडून निधी खर्च करण्यास मान्यता आणा मग आम्ही कर्मचाऱ्यांचे पगार करू यावर बोलताना कमलाकर कोते म्हणाले की शिर्डी ग्रामस्थांचा कोणताही प्रश्न नागरपंचायत मध्ये घेऊन घेऊन गेलो असता सरकार तुमचे आहे तुम्ही मुख्यमंत्री कडून परवानगी आणा असे सांगितले जाते मग शिर्डी नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांनी राजीनामा देऊन प्रशासक नेमावा मग आम्ही बघतो कसे प्रश्न सुटत नाही.जर तुम्ही राजीनामे दिले तर आम्ही एका दिवसात कामगारांचे पगार करू.नगरपंचयातचे नियोजन ढिसाळ आणि नगरपंचायत निष्क्रिय आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले म्हणाले की,कोट्यवधी रुपयांचे नवीन कामाचे भूमिपूजन करता,नगरपंचायत कर्मचाऱयांचे महिन्याच्या महिन्याला पगार केले जातात,स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जिवावर नगरपालिकेने करोडो रुपयांचे बक्षीस मिळण्याबरोबरच शिर्डी नगर पंचायतीच नाव स्वच्छतेच्या माध्यमातून देशभर पोहोचविलं,कोरोनाच्या या कठीण प्रसंगात देखील स्वच्छता कर्मचारी हे एखाद्या योध्याप्रमाणे काम करत आहेत.मग शहर स्वच्छतेचं काम करणाऱ्या गोरगरिबांचे पगार का देत नाही असा सवाल केला…यावेळी सोशल मीडियातील पोस्टमुळे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यात तू तू मै मै झाली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here