मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेत्री कंगणा रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर कंगणाने एका मागोमाग एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये कंगणाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते.
कंगणाने ट्विट करून म्हटले होते की मी ममता बॅनर्जी यांना रावण म्हटले होते. पण रावणाने एक साम्राज्य उभे केले होते, तो एक चांगला शासक होता, उत्तम वीणावादक होता. परंतु ममता बॅनर्जी या रक्तपिपासू राक्षसीण आहेत. ज्यांनी ज्यांनी ममता बॅनर्जी यांना मत दिले आहे त्यांचे हात रक्ताने माखले आहेत असे कंगणाने ट्विट केले होते.






