बेशुद्ध आईला जेसीबीच्या मदतीनं नेलं रुग्णालयात

कोलार (कर्नाटक)– कोरोनाची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीती सर्वांच्या मनात बसली आहे. कर्नाटकमधील कोलार शहरात घडलेल्या घटनेमुळे कोरोनाविषयी लोकांमध्ये किती भीती आहे आणि त्यामुळे माणुसकीदेखील संपली आहे हे स्पष्ट झालं आहे. कोलार येथे एक महिला रस्त्यावर चक्कर येऊन पडली होती. मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने कोणीही त्या महिलेला आपल्या वाहनाने रुग्णालयात दाखल करण्यासाठी तयार नव्हतं. अखेर स्थानिकांनी महिलेला जेसीबीच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, लोक महिलेला आपल्या वाहनातून रुग्णालयात नेण्यास घाबरत होते. यावेळी कोणीही रुग्णवाहिकेला कॉल केला नाही. त्यानंतर स्थानिक लोकांनी महिलेला जेसीबीच्या फावड्यात टाकून रुग्णलायतापर्यंत नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केलं.

महिलंच नाव चंद्रकला असून ती घरकामं आणि हॉटेलमध्ये काम करून घर चालवत होती.४२ वर्षीय चंद्रकला आपल्या १२ वर्षीय मुलीसोबत जात होती. दोघी चिंतामणी येथील कुरुथहल्ली गावात पोहोचल्या होत्या. त्यांनी रात्र येथील एका दुकानासमोर काढली. गावातील काही लोकांनी त्यांना सकाळी जेवनही दिलं होतं. जेवन करून महिला मुलीच्या मांडीवर डोक ठेवून झोपी गेली. मात्र बराचवेळ आई उठत नसल्याचे पाहून मुलीने लोकांना हाक मारली. मात्र कोणीही महिलेला रुग्णालयात नेण्यास तयार नव्हतं. महिलेला कोरोनाची लागण झाली असावी, अशी भीती लोकांना होती. दरम्यान एका जेसीबीच्या सहाय्याने महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मात्र महिलेला कोरोना नव्हता, हेही स्पष्ट झालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here