जळगाव (संपादक सुनिल पाटील) – पारोळा रोडवरील वसंत वाडी जवळ चोपडाहून मालेगाव येथे गुरे वाहून जाताना तेथील ग्रामस्थांनी टेम्पो अडवून त्याच्यातील जनावरे उतरून मालेगाव येथील चालक व क्लिनर ला दोरखंडाने बांधून अमानुष पणे मारहाण केली होती. पारोळा येथील सरकारी रुग्णालयात पोलिसानीं त्यांचेवर दोन दिवस औशोधोपचार केला व उलट त्यांच्यावरच प्राणी सर्जनशील व प्राणी प्रतिबंध कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येऊन त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
शांतता समिती सभेत वाचा फोडली
सदर प्रकरण जळगाव येथील शांतता समिती च्या सभेत मानियार बिरदारीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी एक छोटी व्हिडीओ क्लिप सादर करून मा पोलीस अधीक्षक डॉ उगले व अप्पर पो अ श्रीमती भाग्यश्री नवटके यांच्या कडे चौकशी ची मागणी केली होती.
११ तासाच्या आत कारवाई
सदर प्रकरणी ११ तासाच्या आत पोलीस दलाने कारवाई करीत गुन्हा रजी क्र ११६/२० भादवी ३०७, ३२४, ३२३, १४३, १४७, १४९ व ३७(१)(३) प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल अनिल फकिरा वाघ यांच्या तक्रारीवरून १०० ते १५० लोकां विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातील प्रमुख आरोपी क्र १ ते १३ यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे
पोलीस अधिक्षकांचे अभिनंदन
२० जुलै ची घटना पोलीस अधीक्षक यांना २४ जुलै ला सकाळी १२ वाजता एका व्हिडीओ क्लिप ने निदर्शनास आणली असता त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले व फक्त ११ तासाच्या आत आरोपी निष्पन्न करून भादवी३०७ प्रमाणे सक्त कायदेशीर कारवाई केली व रात्रीच माहिती भ्रमणध्वनी द्वारे फारूक शेख यांना दिली त्या बद्दल जळगाव शहरातील नव्हे तर संपूर्ण जिल्हा व मालेगाव येथील जनसमुदयाने डॉ पंजाबराव उगले व श्रीमती भाग्यश्री नवटके यांचे अभिननंदन केले आहे
कायदा हाती घेणाऱ्यांवर वचक
पोलीस अधीक्षक यांच्या कारवाई वरून संपूर्ण जिल्ह्यात जे लोक अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा विचार करीत असेल त्यांच्यावर वचक निर्माण झालेला आहे. कोणाला जर असा त्रास होत असेल तर त्यांनी त्वरित संबधित पोलीस स्टेशनला तक्रार करावी असे सुद्धा आवाहन पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी केले आहे







