हजार रुपयांत कोरोनाचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या सिनर्जी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला अटक

सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – भरमसाट पैसे घेऊन बनावट कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱया सिनर्जी हॉस्पिटलच्या कर्मचाऱयाला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने रंगेहाथ पकडले आहे. स्वप्नील सुरेश बनसोडे (वय 25) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिल्हाबंदी आहे. एका जिह्यातून दुसऱया जिह्यात जाण्यासाठी कोविड रिपोर्ट आवश्यक आहे. स्वप्नील बनसोडे हा सिनर्जी हॉस्पिटलमध्ये आयटी डिपार्टमेंटमध्ये सीनियर एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करतो.

तो लोकांचे स्वॅब न घेता त्यांना कोरोना चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट देत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना मिळाली. त्यांनी तातडीने बनावट ग्राहक पाठवून स्वप्नील बनसोडेची बनावटगिरी उघडकीस आणली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here