महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त युगपुरुष प्रतिष्ठान कडून सॅनीटायझरचे वाटप

युगपुरुष प्रतिष्ठान यांचा स्तुत्य उपक्रम

नवी मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त युगपुरुष प्रतिष्ठान यांच्या तर्फे नवी मुंबईत ठिकाण ठिकाणी स्वछता कामगार ,बिगारी कामगार, पोलीस अधिकारी,रिक्षा टॅक्सी चालक यांना सेनेटायझरचे वाटप शनिवार दि १मे २०२१ रोजी  करण्यात  आले.

या वाटपाच्या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर म्हणून सिनेअभिनेत्री नयन पवार तसेच डॉ शितल सातपुते, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे, युगपुरुष प्रतिष्ठानचे संस्थापक आजित खताळ, युगपुरुष प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेशजी तायडे इत्यादी मान्यवर यांच्यासह  लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे खजिनदार  विक्की वांडे , वीरेंद्र लगाडे साहेब,दिलीप आमले साहेब,प्रकाश खलाटे साहेब इम्रान नाईक साहेब व प्रतिष्ठानातील सर्व सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here