कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – सतेज (बंटी) पाटील यांचे स्वीय सहाय्यक सागर राणे यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पध्दतीने कोरोनाविषयक सर्व नियम सांभाळून साजरा करण्यात आला.
सागर राणे सतेज (बंटी) पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून गेली 20 वर्षांहून अधिक काळ त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत काम करत आहे. सकाळी लवकर सागरचे त्यांच्यासोबतचे काम सुरू होते ते रात्री कधी संपेल याचा नियम नाही. आलेल्या प्रत्येक फोनची दखल घेत प्रत्येकाला नीट व्यवस्थित निरोप देणे, कामाचे स्वरूप आणि तसेच सतेज (बंटी) पाटील यांची उपलब्धता बघून भेटणाऱ्याना योग्य वेळ देणे, लोकांचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहचवणे आदी गोष्टी सागर एकदम सहजरित्या करतो.
सतेज (बंटी) पाटील यांच्या राजकीय सुरवातीपासूनच सागर त्यांच्यासोबत आहे. आपल्याला लोकप्रतिनिधी दिसतो पण त्यांच्यामागे अविरत काम करणारी सागरसारखी माणसं महत्वाची असतात. सागराची एनर्जी सकाळीसुद्धा तशीच असते आणि रात्री 12 वाजतासुद्धा तशीच असते. त्याला सततच्या कामामुळे कुटुंबियांनासुद्धा हवा तसा वेळ देता येत नाही, अशात पण सागरचे डेडिकेशन आणि काम करण्याची ऊर्जा कौतुकास्पद आहे. सागर वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आई अंबाबाई निरोगी दीर्घायुष्य देवो आणि असेच सतेज (बंटी) पाटील यांच्यासोबत सावलीसारखे काम करत राहा, हीच बुलंद पोलीस टाइम्सतर्फे शुभेच्छा.






