रुग्णांची अडचण सोडविण्यासाठी शिवसेना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची रात्री ११ वाजता रूग्णालयात धाव

मै हुं ना काळजी करू नका म्हणत नातेवाईकांना दिला धीर

धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) – तालुक्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्याने रुग्णालयात गर्दी झाली असून ऑक्सीजन बेड उपलब्ध होत नसल्याने नातेवाईक हतबल झाले आहे. ऑक्सीजन बेड मिळत नसल्याने एका रुग्णाच्या नातेवाईकांने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना दि ४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता फोन केला ज्ञानेश्वर पाटील यांनी रात्री ११ वाजता उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन रूग्णाला ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देऊन, नातेवाईकांना धीर दिला व डॉ कुलकर्णी व डॉ पठाण यांच्याशी चर्चा केली.

ऑक्सीजन मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजनचे जम्बो सिलेंडर बसविण्याची सिस्टम तात्काळ बसविण्याच्या सूचना आ.ज्ञानेश्वर पाटील यांनी दिल्या. परंडा उपजिल्हा रुग्णालयासाठी तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथून ऑक्सीजन पुरवठा होत असून, जिल्हाभरात ऑक्सीजनची मागणी वाढल्याने सिलेंडर घेण्यासाठी ताटकळत बसावे लागते. ऑक्सीजन वेळेत नाही पोहचल्यास अनेक रूग्णांच्या जिवीताला धोका निर्माण होत आहे. अशा या कठीण काळात वेळेवर ऑक्सीजन वाहतुक करून रुग्णासाठी पुरवठा करणारे परंडा शहरातील बाबा गॅरेजचे मालक आरीफ शेख व त्यांचा भाऊ शरीफ शेख हे दोघे विना मोबदला रमजानचा रोजा असताना परिश्रम घेत आहेत. त्यांच्या सहकार्याला वाहन चालक आजीम मुजावर हे जिवाची बाजी लावून काम करीत आहे ऑक्सीजन बॉय म्हणून त्यांची ओळख पुढे येत आहे .

रूग्णासाठी ऑक्सिजन सप्लायसाठी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी जाधव व त्यांचे सहकारी २४ तास कार्यरत आहेत. तालुक्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तालुका आरोग्य आधिकारी डॉ सय्यद तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पठाण, डॉक्टर कुलकर्णी यांच्यासह आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत. उपजिल्हा रुग्णालयातील ५० रूग्ण ऑक्सीजन वर असून दर २० मिनिटाला एक सिलेंडर लागते. २४ तासात ७० ते ८० सिलेंडरची गरज पडत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन रस्त्यावर उतरले असून, नागरीक नियमांचे पालन करीत नसल्याने महसूल , पोलिस , नगर परिषद प्रशासनाच्या संयूक्त पथकाने नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली आहे. दि ५ मे रोजी पासून प्रशासनाने धोरण आधिक कडक केले आहे. पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे सहाय्यक पोलिस निरिक्षक ससाने , तसेच ,नायब तहसिलदार मिलींद गायकवाड , मंडळ आधिकारी पाटील , तलाठी चुकेवाड व नगर परिषदेच्या पथकाने नियम मोडणाऱ्या नागरिकावर कारवाई केली .

परंडा तालूक्यातील रुग्ण संख्या वाढली असून तालूक्यातील ५४१ कोरोना रूग्णावर उपचार सुरू आहे तर एकुन ९९ रुग्णांचा मुत्यू झाला आहे. परंडा तालूक्यातील काळेवाडी , देऊळगाव कुक्कडगाव, , अरणगाव , , चिंचपुर बुद्रक अनाळा, शेळगाव, शिराळा ,वाटेफळ , साकत बुद्रुक ,रोसा , खंडेश्वरवाडी , घारगाव या गावात कोरोना रूग्ण संख्या वाढल्याने १३ गावे हॉट स्पॉट झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here